Wednesday, 21 November 2018

#IPL2018 मुंबई इंडियन्सचा विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अखेर विजयी सूर गवसला. कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबंद ९४ धावांच्या जोरावर मुंबईनं बेंगळुरूला ४६ धावांनी नमवून आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं एकाकी झुंज दिली, मात्र ती व्यर्थ ठरली.

वानखेडे मैदानात रोहितचा 'जलवा' अखेर पाहायला मिळाला. त्याच्या ९४ धावांच्या जोरावर मुंबईनं बेंगळुरूसमोर २१४ धावांचं कठीण आव्हान ठेवलं. रोहितच्या या जबरदस्त खेळीत १० चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. याशिवाय एविस लुइसनं ६५ धावा तडकावल्या. या खेळीत ६ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. मुंबईचं कठीण आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची अवस्था पहिल्या दहा षटकांत बिकट झाली. विराट कोहली एका बाजूनं किल्ला लढवत होता. त्यानं अखेरपर्यंत मैदानात झुंज दिली. त्यानं नाबाद ९२ धावा कुटल्या. तो एका बाजूनं लढत असताना त्याचे शिलेदार एकेक करून तंबूत परतत होते. बेंगळुरूला २० षटकांत ८ गडी गमावून १६७ धावाच करता आल्या.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card