Tuesday, 22 January 2019

#IPL2018 किंग्ज इलेव्हन पंजाबचा चार धावांनी विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीयल ११च्या गुणतालिकेत सलग दोन सामने जिंकल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जवर चाहत्यांची अपेक्षा वाढली होती. माञ रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबबरोबर हरल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचे चाहते नाराज झाले. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने चार धावांनी विजय मिळवला. ख्रिस गेलच्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबला चेन्नईपुढे 198 धावांचे आव्हान ठेवता आले. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले, तर चेन्नईची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

पंजाबच्या 198 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली नाही. रायुडू बाद झाल्यावर धोनीने सामन्याची सारी सूत्रे हातात घेतली. या सामन्यात पुन्हा एकदा जुना धोनी पाहायला मिळाला. त्याची फटकेबाजी पाहून चेन्नईच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेरच्या षटकापर्यंत धोनीने पंजाबला कडवी झुंज दिली, पण त्याला चेन्नईला विजय मिळवून देता आला नाही. धोनीने 44 चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटाकारांच्या जोरावर नाबाद 79 धावांची खेळी साकारली.

चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. दीपक चहारच्या पहिल्या षटकात लोकेश राहुलने दोन चौकार लगावत संघाला चांगली सुरुवात करून दिली. गेलनेही आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत दणक्यात सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सामन्यात गेलने 22 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर संघाला 10 षटकांमध्ये 115 धावांची मजल मारून दिली. पण शेन वॉटसनने यावेळी गेलला बाद करत चेन्नईला मोठे यश मिळवून दिले. गेलने 33 चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 63 धावांची झंझावाती खेळी साकारली. गेल बाद झाल्यावर पंजाबच्या धावगतीला थोडा ब्रेक लागला आणि त्यांना 20 षटकांत 197 धावा करता आल्या. 

 

loading...

राशी भविष्य