Sunday, 18 November 2018

आता आयपीएल पाहा जिओच्या 5जी नेटवर्कवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक ऑफर आणली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम आणि दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये जिओ 5जी नेटवर्कची सेवा देणार आहे. 7 एप्रिल ते 27 2018 मे दरम्यान आयपिएल मॅच होणार आहेत. जियोच्या वृत्तपत्रानुसार, दोन्ही स्टेडियम मोठ्या प्रमाणावर एमआयएमओ 5जी ,4जी आणि इतर वायफाय सेल्सशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना अधिक जलद सेवा मिळणार आहे.

‘जिओ जगातील सर्वात वेगाने वाढणारे नेटवर्क असल्याने आमच्या ग्राहकांना एक वेगळा अनुभव मिळणे आवश्यक आहे. हे प्रगत प्री-5जी आयपीएल डिजिटल अनुभवासह उच्च क्षमतेचे नेटवर्क सक्षम करेल’. असे जिओने म्हटलयं. जिओने नुकतेच रु. 251 प्रीपेड पॅक आयपीएल 2018 च्या चाहत्यांसाठी लक्ष्यित केले आहे.

या पैकमध्ये 51 दिवसांच्या वैधतेसह एकूण 102 जीबी 4 जी डेटा (2 जीबी प्रति दिन) उपलब्ध आहे, जो यावर्षीच्या आयपीएल प्रीमियर लीगचा कालावधी आहे. या पॅकमध्ये न वापरलेले डेटा दररोज मध्यरात्री कालबाह्य होईल. हे दररोज अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 एसएमएस संदेश देखील ऑफर करते. जिओ आपला एमआयएमओ 5जी नेटवर्क टेस्टिंगच्या स्वरुपात वापरणार आहे. या नेटवर्कच्या लॉंचिंगबाबत जिओनं काहीच जाहीर केलेले नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card