Friday, 16 November 2018

‘स्मिथ आणि वॉर्नरवर घातलेली बंदी योग्य’, बॉल टेम्परिंग प्रकरणी सचिनचे ट्विट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

"कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं घातलेली बंदी योग्यच आहे", असं ठाम मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं व्यक्त केलंय. सचिन तेंडुलकरनं या संदर्भात एक ट्विट केलं असून स्मिथ-वॉर्नरवरील बंदीच्या निर्णयाचं स्वागत केलंय.

चेंडू कुरतडल्याप्रकरणी सचिनंनं ट्विट केलंय. "क्रिकेट खेळ हा पारदर्शकपणे खेळला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. असं असलं तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं याबाबत जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य आहे. संघासाठी विजय महत्त्वाचा असतो. परंतु, तो तुम्ही कशा पद्धतीनं मिळवता हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं", असंही सचिननं आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card