Sunday, 18 November 2018

क्रिकेटच्या खेळाला काळीमा ; ऑस्ट्रेलियाने चेंडू कुरतडला

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात काल ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून बेनक्रॉफ्टने चेंडू कुरतडण्याचा लाजिरवाणा प्रकार केलाय. एका पिवळ्या रंगाच्या वस्तूच्या साहाय्याने त्याच्याक़डून चेंडूशी छेडछाड करतानाचे दृश्य कॅमेरात कैद झालंय.

कर्णधार स्मिथने कालच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही चूक मान्य केली आहे. शिवाय बॉल कुरतडने ही केवळ एका खेळाकडून घडलेली चूक नव्हती तर तो आमच्या संघाच्या रणनीतीचाच भाग होता, असंही स्मिथने सांगितलंय.

चेंडूकडून मदत मिळत नसल्यावर तो कुरतडण्याच्या घटना याही अगोदर घडल्या आहेत. परंतु यावेळी या प्रकरणात संपूर्ण संघच सामील असल्याने क्रीडा जगतात खळबळ उडाली आहे. या लाजिरवाण्या कृत्यामुळे जगभरातून ऑस्ट्रेलियन टीमवर जोरदार टीका केली जातेय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card