Sunday, 20 January 2019

मैदानावर वृद्धीमान साहाचं वादळ , अवघ्या 20 चेंडूंमध्ये ठोकलं शतक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

वृद्धीमान साहाने कोलकत्त्यात चालू असलेल्या जेसी मुखर्जी ट्रॉफीत अवघ्या २० चेडूंत १०२ धावांची तडाखेबंद खेळी केली आहे. अशी कामगिरी करणारा साहा हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.

या खेळीदरम्यान त्याने १४ षटकार आणि ४ चौकारांची आतषबाजी करत सर्वांनाच धक्का दिला. साहाच्या या खेळीच्या जोरावर त्याच्या मोहन बगान या संघाने प्रतिस्पर्धी संघावर १० विकेट्सने विजय साजरा केला. ‘ सामन्याच्या सुरूवातीलाच मला लय सापडली होती,ज्यामुळे मला मोठे फटके खेळण्यासाठी आत्मविश्वास मिळाला’, असं सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना साहाने सांगितलं.

साहावर आयपीएल मध्ये या वर्षी तब्बल ५ कोटींची बोली लागली आहे. आणि अशातच आयपीएल सुरू होण्याच्या पार्श्वभुमीवर साहाने केलेल्या खेळीमुळे त्याचा आयपीएल संघ सनरायजर्स हैद्राबाद चांगलाच आनंदी झाला असेल.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card