Sunday, 20 January 2019

श्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, कोलंबो

आज भारत आणि श्रीलंकेमध्ये टि-20 सिरीजमधला पहिला सामना सुरु होण्यापूर्वी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेत 10 दिवसांच्या आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

मुस्लिम आणि बौद्ध समाजात वाढलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर, दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेमध्ये वर्षभरापासून या दोन समुदायामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील हिंसाचार वाढला आहे.

मुस्लिम आणि बौद्ध समाजात तणाव वाढल्याने, श्रीलंकेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने आणीबाणीचा निर्णय घेतला आहे. आणि या आणीबाणीमुळे सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card