Saturday, 18 November 2017

टीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार अडकणार विवाह बंधनात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

टीम इंडियाचा स्टार बॉलर भुवनेश्वर कुमार विवाह बंधनात अडकणार आहे. 23 नोव्हेंबरला मेरठमध्ये ब्राऊरा हॉटेलमध्ये शाही सोहळा होणार आहे.

यावेळी भुवी त्याची बेटर हाफ नुपूर नागरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. तर, रिसेप्शन सोहळा 26 नोव्हेंबरला भुवीच्या पैतृक गावात होणार आहे.

5 डिसेंबरला दिल्लीच्या ताज हॉटेलमध्येही रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत दिग्गजही उपस्थित असतील.

काही महिन्यांपूर्वीच भूवनेश्वरने नूपुरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यावेळी फोटोमध्ये आपली 'बेटर हाफ' नुपूर नागर असल्याचा खुलासाही त्याने केलेला. दरम्यान या शाही सोहळ्यासाठी भुवनेश्वर आणि नुपूर सज्ज झाले असून सगळ्याचं लक्ष या ग्रँड सोहळ्याकडे लागलंय़.

Top 10 News

झटपट रेसिपी

Facebook Likebox

Popular News