Wednesday, 16 January 2019

वनडेच्या पहिल्याच सामन्यात भारताचे पारडे जड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, चेन्नई

 

रविवारी झालेल्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतील पहिलाच सामना भारताने डकवर्थ लुईस नियमांतर्गत 26 धावांनी जिंकला.

 

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 7 विकेट गमावूनही क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी त्यांच्या दमदार खेळीने 281 धावा केल्या.

 

भारताच्या फलंदाजीनंतर पावसाने व्यत्यय आणला आणि ऑस्ट्रेलियाला 21 षटकांमध्ये 164 धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट गमावून केवळ 137 धावांचीच खेळी केली आणि वनडे मालिकेत अखेर भारताचा विजय झाला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card