Wednesday, 21 November 2018

महिला हॉकीपटू ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला रेल्वे ट्रॅकवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

महिला हॉकीपटू तसेच राष्ट्रीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणारी ज्योती गुप्ता रेल्वे ट्रॅकवर मृतावस्थेत आढळून आली आहे. बुधवारी संध्याकाळी हरियाणाच्या रेवारी येथील रेल्वेमार्गावर मृतदेह आढळला. प्रीतीचे वय केवळ 20 वर्ष होते. मात्र, ही आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

संध्याकाळी साडे आठच्या आसपास चंदीगड जयपूर एक्स्प्रेसच्या मोटारमॅने हा मृतदेह पाहिला. यानंतर मोटारमॅन ही माहिती जीआरपी पोलिसांना दिली. बुधवारी सात वाजण्याच्या सुमारास ज्योतीचे आपल्या कुटुंबाशी अखेरचं बोलणं झालं होते. मात्र रात्री सडेदहा वाजता तिच्या आईने तिला पुन्हा फोन केला असता पोलिसांनी तिच्या मृत्यची माहिती तिच्या घरच्यांना दिली. ज्योती ही जूनमध्ये हिमाचल प्रदेशच्या शिलरु येथे तीन महिन्यांच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाली होती. तर या आधी जोहान्सबर्ग येथे झालेल्या विश्व हॉकी लीग उपांत्य फेरीमध्येही तिचा समावेश झाला होता..

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card