Wednesday, 16 January 2019

चेन्नईच 'किंग' कोलकाताचा दारुण पराभव

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आयपीएलच्या ११ व्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये चुरशीची लढत रंगली. ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जाडेजानं अखेरच्या फटकावलेल्या 19 धावांनी चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या रणांगणात सलग दुसरा सनसनाटी विजय मिळवून दिला.

या सामन्यात चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा एक चेंडू आणि पाच विकेट्स राखून पराभव केला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जनी घरच्या मैदानात आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा विजय मिळवलाय. नाणेफेक जिंकून चेन्नईनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
अॅण्ड्यू रसेलच्या आक्रमक फंलदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपरकिंग्जसमोर २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईच्या संघानं पेलत विजय मिळवला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card