Wednesday, 23 January 2019

कारगिल विजय दिन.. असा मिळवला

Previous Next

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

26 जुलै 1999 रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकावला. तेव्हापासून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.  8 मे रोजी युद्धाला सुरुवात झाली होती. 26 जुलै रोजी भारतीय सैन्यानं या युद्धाची विजयी समाप्ती केली. जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ हे युद्ध चालले.

1999 मध्ये गुराख्यांनी पाकिस्तानकडून घुसखोरी झाल्याची माहिती लष्कराला दिल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात ही सैनिक कारवाई करण्यात आली. मे १९९९ मध्ये सुरू झालेले कारगिल युद्ध ७७ दिवस चालले. नियंत्रण रेषेपलिकडे घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी सडेतोड प्रतिउत्तर देत २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानच्या चारी मुंड्या चीत केल्या. तेव्हापासून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांवर २.५ लाख रॉकेट डागले. म्हणजे दररोज पाच हजार रॉकेट डागण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट केवळ दुस-या महायुद्धात डागण्यात आले होते. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले त्यापैकी ५२७ शहिद, तर १३६३ जवान गंभीर जखमी झाले. यात पाकिस्तानचे ७०० सैनिक मारले गेले.

भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा यशस्वी मारा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात १० हजार कोटी रुपये खर्च झाले. हवाई दलाने या युद्धात महत्वाची जबाबदारी पार पाडली.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य