Wednesday, 23 January 2019

आई-वडील रागावल्याने 9 वर्षीय मुलाची आत्महत्या

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे 9 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 दिवसांपूर्वी शाळेत का जात नाही, या कारणावरुन त्याला आई- वडील ओरडले होते आणि या रागातून तो घर सोडून निघून गेला होता.

8 दिवसांपूर्वी शाळेत का जात नाही, शाळेत अभ्यास का करत नाही ?, या कारणावरुन त्याला आई-वडील ओरडले होते. यामुळे मुलगा रागावला होता आणि तो घरातून निघून गेला. सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास परिसरातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे. मुलाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनानंतरच या प्रकरणाचं नेमकं कारण उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य