Thursday, 17 January 2019

दहीहंडी कार्यक्रमादरम्यान राम कदम आणखी एका वादात!

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राम कदम यांचा दहीहंडीच्या कार्यक्रमातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. महिलांबद्दल मुक्ताफळ उधळणाऱ्या आमदार राम कदम यांनी  हंडीच्या जवळ पोहोचलेल्या  गोविंदाना खाली उतरवण्याचा प्रतापही करुन दाखवला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात अभिनेत्री प्राची देसाईनं हजेरी लावली होती, यावेळी राम कदम यांनी प्राचीला तिचा आवडता डायलॉग म्हणण्यास सांगितलं.

 यावेळी गर्दीला उद्देशून ती ‘बोलबच्चन’ सिनेमातला एक डायलॉग बोलत होती. प्राचीने डायलॉग बोलायला सुरुवात केली इतक्यात एक गोविंदा पथक मानवी मनोरे रचून हंडीच्या जवळ पोहोचले.

मात्र त्याचवेळी गोविंदानी दहीहंडीचे 8 थर लावले होते आणि दहीहंडी फोडण्यास सज्ज होते. मात्र त्याचवेळी प्राची देसाईच्या डायलॉगसाठी राम कदम यांनी हंडी फोडण्यापासून रोखलं.दमबाजीच्या स्वरात त्यांनी या  गोविंदाना खाली उतरण्यास सांगितले. मी तुम्हाला योग्यवेळी सूचना देईन तेव्हाच हंडी फोडा  असा अप्रत्यक्ष दम या गोविंदांना  कदमांनी दिला. गोविंदाही निमूटपणे खाली उतरले.

 

प्राची देसाई डायलॉग म्हणत असल्याने राम कदमांनी गोविंदांना खाली उतरवलं

पाहुयात नक्की काय आहे हा प्रकार - 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य