Thursday, 17 January 2019

मुंबईची लाइफलाईनला ब्रेक, प्रवाशांचे झाले हाल...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन. जेव्हा लोकल ट्रेन रद्द होते, तेव्हा त्याचा परिणाम मुंबईच्या चाकरमान्यांना भोगावा लागतो. सध्याही पश्चिम रेल्वेने प्रवास करणा-या मुंबईकरांना अशाच प्रसंगाशी सामना करावा लागतोय. कारण मागील 4 दिवसांत पश्चिम रेल्वेच्या 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. 12 ते 16 ऑगस्ट दरम्यान 2 सार्वजनिक सुट्ट्या होत्या. मात्र तरीही प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या फे-या रद्द होण्याचे कारण तांत्रिक बिघाड नसून मोटरमननी ओव्हरटाइम काम करण्यास दिलेला नकार हे आहे. 

काय आहे नेमकं कारण?

मोटरमन दर दिवशी 8 तास काम करतात. पश्चिम रेल्वेचे बहुतांश मोटरमनना 8 तासांचं काम करून ओव्हर टाईम लावला आहे.

याचं कारण मोटरमनचा ओव्हरटाइम हा तासांमध्ये न मोजता फेऱ्यांमध्ये मोजला जातो.

एखाद्या मोटरमनला दिवसातून 3 फेऱ्या अनिवार्य असतील तर त्या दिवसाची चौथी फेरी ही ओव्हरटाईम म्हणून मानली जाईल. मग जरी मोटरमनने ती फेरी 8 तासांची केली असली तरीही तो ओव्हरटाईमचं असेल. 

त्यामुळे दिवसाला नेमून दिलेल्या फेऱ्या झाल्यानंतर मोटरमननी अधिक फेऱ्या करण्यासाठी नकार दिला आहे. 

  • मोटरमननी गेल्या तीन महिन्यांत केलेल्या ओव्हरटाईमचा आकडा 4.6 लाख रुपये
  • मागील 4 दिवसांत पश्चिम रेल्वेच्या 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या
  • दर एक रेल्वे लोकल रद्द केल्याचा त्रास सुमारे 2500 प्रवाशांना होतो

या सर्व तांत्रिक अडचणींचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तरी ट्रेनचं वेळापत्रक कोलमडू नये, यासाठी पश्चिम रेल्वेकडून पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकलमधून प्रवास करताय सावधान!

  • मागील 4 दिवसांत पश्चिम रेल्वेच्या 100 फेऱ्या रद्द करण्यात आल्या
loading...

Top 10 News

राशी भविष्य