Friday, 18 January 2019

#HappyIndependenceDay: जाणून घ्या तिरंग्याचे वैशिष्ट्ये...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अशाप्रकारे झाला तिरंग्याचा जन्म

 • मच्‍छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या तिरंग्याचे रचनाकार
 • 31 मार्च 1921 मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर
 • मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर
 • तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला.
 • 15 ऑगस्ट 1946 रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता
 • भारतीय संविधान समितीकडून 22 जुलै 1947 रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर
 • भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी‘तिरंगी ध्वज’ भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत

तिरंग्याची रचना -

 • भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२
 • राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम
 • एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्टे
 • वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग
 • मधल्या पांढर्‍या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे असलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे आहे. चक्राला २४ आरे आहेत.

ध्वजातील तीन रंगीत पट्ट्यांचे अर्थ -

 • भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर
 • केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
 • ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना
 • वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध
 • मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध
 • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध
 • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो.
  जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.
loading...

Top 10 News

राशी भविष्य