Friday, 18 January 2019

आरक्षणासाठी आता धनगर समाजही आक्रमक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे राज्यभर आंदोलन सुरु असतानाच आता धनगर समाजही आक्रमक पाहायला मिळले.  सोमवारपासून राज्याच्या विविध भागांमध्ये धनगर समाजातर्फे आंदोलन केले जाणार आहे. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलन सुरु आहे.

धनगर आणि धनगड असा शब्दाचा खेळ करून धनगर समाजाला अरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले, 31 ऑगस्टपर्यंत अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.dhangar-community-show-aggressive-for-the-reservation

धनगर समाजाच्या मागण्या -

 • ताबडतोब धनगर आरक्षण जाहिर करा 
 • सत्तेवर येतांना पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देण्याच आश्वासन, अडीचशे कॅबीनेट झाल्या प्रस्ताव धुळखात
 • सरकारनं टिसला अहवाल तयार करायला सांगीतलाय, मात्र 3 वर्षापासून अहवाल तयार नाही
 • महाराष्ट्रात धनगर, धनगड हा एकच शब्द आहे. या स्वरुपाचा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा 
 • 14 ऑगस्टला सर्व तहसिल कार्यालयावर निवेदन देणार, 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देणार
 • 8 सप्टेंबरला चौडी इथ मेळावा, तिथून आंदोलनाची रुपरेषा ठरणार

इथे उमटले आंदोलनाचे पडसाद - 

 • नागपूरमधील गुमगाव – वर्धा रोडवर खासदार विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाज रस्त्यावर उतरला.
 • नागपुर- सोलापुर हायवेवर रास्ता रोको, रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत,रस्त्यावर शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन. 
 • गुमगाव – वर्धा रोडवर आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 • आंदोलकांनी रस्त्यावर आंदोलन केल्याने वाहतूक खोळंबली
 • बीड : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणी करता बीड जिल्ह्यामध्ये धनगर समाज रस्त्यावर
 • 12 ठिकाणी चक्काजाम तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण
 • जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून केला निषेध
 • ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांची जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर थांबून माननीय संदर्भात दिले निवेदन
 • चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी डॉ. इंद्रकुमार भिसे आणि आंदोलकांनी आंदोलन केले.
 • धनगर समाजाला निवडणुकीपुर्वी जाहीर केलेले आरक्षण आद्यापर्यंत मिळाले नसल्याने आज 13 आँगस्ट राेजी सकाळी 10 वाजल्यापासून जिंतूर - येलदरी टी - पाँईंटवर रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आलं
 • आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आज नागपूर मध्ये रस्त्यावर उतरला होता ...
 • धनगर समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्यांसाठी जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर ती धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला.
 • हिंगोली- धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी कुरुदा इथ बाजार पेठ बंद तर कन्हेरगाव इथ हिंगोली- आकोला महामार्गवर रास्ता रोको आंदोलन
 • वर्ध्यात धनगर समाज बांधव रस्त्यावर
 • रायगड - धनगर समाजाचा जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा...
loading...

Top 10 News

राशी भविष्य