Tuesday, 22 January 2019

वैभव राऊत यांच्या अटकेनंतर एटीएसच्या तपासाला वेग...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नालासोपाऱ्यातील स्फोटक सापडल्याप्रकरणी तिघांच्या अटकेनंतर एटीएसच्या तपासाला वेग आलं आहे. पुणे आणि सोलापूरातून आणखी चौघांना ताब्यात घेतलं आहे. आता तिघांच्या चौकशीकडे लक्ष ठेवण्यात येत आहेत.
 
नालासोपाऱ्यातून वैभव राऊत आणि पुण्यातून तीन संशयितांना अटक केल्यानंतर राज्य दहशतवादविरोधी पथकाचे शोधकार्य अद्यापही सुरु आहे. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारा येथे ही कारवाई कऱण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची दहशतवादविरोधी पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भातही या तिघांची चौकशी होणार आहे.

या तिघांविरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यातील १६, १८, २०, भारतीय दंड संहितेतील कलम १२०ब, भारतीय स्फोटके कायदा आणि स्फोटजन्य पदार्थ कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

घातपाताचा कट एटीएसने उधळला ►

घातपाताचा कट, ATS ची कारवाई...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य