Friday, 18 January 2019

मुंबई महापालिकेच्या शाळेत औषधातून विषबाधा, विद्यार्थीनीचा मृत्यू...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील गोवंडीच्या शिवाजी नगरमधील महापालिकेच्या संजय नगर शाळेतील विध्यार्थ्याना देण्यात येणाऱ्या औषधातून विषबाधा झाली यात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. जंतनाशक ऑबेंडोझोल गोळी देण्यात आल्या होत्या. ह्या गोळ्या पोटातील जंत मारतात म्हणून देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

तर जवळपास 56 मुलांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. यातील काही मुलांना मळमळ,उलटी तसेच डोके दुःखी ,चक्कर येणे सुरू आहे.

पालक, स्थानिक, नागरिक आणि पोलीस यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात आणण्यात आले तर काहींना रिक्षा तसेच बेस्टबस मधून येथे आणण्यात आले आहे.

याच वेळी संतप्त पालकांनी आणि परिसरातील रहिवाश्यांनी शाळेसमोर आपला राग व्यक्त करण्यासाठी घोषणाबाजी करून शाळेत घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन या गर्दीला पांगविले. तर राजावाडी रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य