Wednesday, 12 December 2018

मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा क्रांती मोर्चाकडून 9 ऑगस्ट क्रांतीदिना दिवशी मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईसह नवीमुंबई, ठाणे वगळता मराठा क्रांती मोर्चाने राज्यभर बंदची हाक दिली आहे.

मात्र या पार्श्वभूमीवर नवीमुंबई बंदमध्ये नसतानाही उद्या नवीमुंबईतील एपीएमसी मार्केट आणि शाळा बंद ठेवण्यात आले आहेत. 

 

तसेच गुरुवारी पुणे पोलिसांकडून पुणे शहर व हद्दीलगतच्या परिसरामध्ये आंदोलन होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीकडून काही मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, वाहतूक नियंत्रण कक्ष 24 तास सुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांनी माहितीकरीता 020-24503206 या क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

 

बंददरम्यान हे मार्ग बंद असणार आहेत

 • पुणे नाशिक रोड - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद असणार आहेत.
 • निगडी ते चाकण - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद असणार आहेत.
 • एमआयडीसी, वडगाव चाकण रस्ता - या रस्त्यावरील सर्व मार्ग बंद असणार आहेत.
 • पुणे मुंबई रोड - या रस्त्याने निगडीच्या पुढे देहूगाव, वडगाव, कामशेत व किवळेकडे जाणारे सर्व बसमार्ग बंद ठेवण्यात येणार आहेत.
 • पौड रस्ता - या रस्त्याने संचलनात असणारे बसमार्ग केवळ चांदणी चौकापर्यंतचं सुरु असणार आहेत.
 • सिंहगड रोड - वडगाव धायरीच्या पुढे जाणारे सर्व बसमार्ग बंद असणार आहेत.
 • मांडवी बहूली रोड - या रस्त्याने सुरु असणारे बसमार्ग फक्त वारजे माळवाडी पर्यंतच सुरु असणार आहेत.
 • पुणे सातारा रोड - या रस्त्याने नसरापूर, कोंढणपूर, शिवापूरकडे संचलनात असणारे बसमार्ग फक्त कात्रजपर्यंतच सुरु असणार आहेत.
 • कात्रज सासवड रोड (बोपदेव घाट) - बोपदेव घाटमार्गे जाणारे सर्व मार्गावरील बस येवलेवाडीपर्यंतच सुरु असणार आहेत.
 • हडपसर सासवड रोड - या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग फुरसुंगी पर्यंतचं सुरु असणार आहेत.
 • पुणे सोलापूर रोड - या रस्त्याने संचलनात असणारे सर्व मार्ग शेवाळवाडी आगारपर्यंतचं सुरु असणार आहेत.
 • पुणे नगर रोड - या रस्त्याने संचलनात असणारे सर्व बसमार्ग वाघोलीपर्यंत सुरु असणार आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, सामान्य नागरिकांचे हाल

खाद्यपदार्थांच्या वादावर राज्य सरकारचा यू-टर्न...

loading...

Top 10 News

राशी भविष्य