Wednesday, 16 January 2019

‘डॉक्टर देव असतात’ याचं प्रात्यक्षिक उदाहरण...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या बंदचा आज दुसरा दिवस आहे. बंददरम्यान मुंबईतल्या सर्वात मोठ्या जे.जे रुग्णालयातील सर्व नर्सेस, वॉर्ड़ बॉय, सफाई कामगार, टेक्निशीयन कर्मचारी संपावर आहेत.

त्यामुळे रुग्णालयातील यंत्रणा कोलमडल्या असून केवळ आपातकालीन शस्त्रक्रीया सुरु आहेत.

तसेच इतर सर्व शस्त्रक्रीया ठप्प झाल्या आहेत. रुग्णालय प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी शिकावू नर्सेस, बाहेरील सफाई कामगार, हमाल आणि सुरक्षा गार्ड बोलावण्यात आले आहेत.

या रुग्णालयात दररोज 1600 रुग्णांना जेवण देण्यात येतं, मात्र कॅन्टीन कर्मचारी संपात सहभागी झाले असल्यामुळे कॅन्टीन सेवा ठप्प झाली आहे.

यावर तोडगा म्हणून डॉक्टरांनी स्वता: या ठिकाणी जेवण पॅकींग केलं असून ते रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. यामध्ये रुग्णालयातील जवळपास 200 डॉक्टर्स रुग्णांची सेवा करत आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या बंदचा आज दुसरा दिवस

  • मुंबईतल्या सर्वात मोठ्या जे.जे रुग्णालयातील सर्व नर्सेस, वॉर्ड़ बॉय, सफाई कामगार, टेक्निशीयन कर्मचारी संपावर
  • त्यामुळे रुग्णालयातील इतर सर्व शस्त्रक्रीया ठप्प असून केवळ आपातकालीन शस्त्रक्रीया सुरु
  • रुग्णालय प्रशासन सुरळीत चालवण्यासाठी शिकावू नर्सेस, बाहेरील सफाई कामगार, हमाल आणि सुरक्षा गार्ड बोलावण्यात आले
  • रुग्णालयात दररोज 1600 रुग्णांना जेवण देण्यात येतं
  • मात्र कॅन्टीन कर्मचारी संपात सहभागी झाले असल्यामुळे कॅन्टीन सेवा ठप्प
  • यावर तोडगा म्हणून डॉक्टरांनी स्वता: या ठिकाणी जेवण पॅकींग केलं असून ते रुग्णांपर्यंत पोहोचवले
  • यामध्ये रुग्णालयातील जवळपास 200 डॉक्टर्स सहभागी

खाद्यपदार्थांच्या वादावर राज्य सरकारचा यू-टर्न...

मराठा आरक्षण : ९ ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक, नवी मुंबई-ठाणे वगळलं

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य