Saturday, 17 November 2018

मराठा आरक्षण : मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आरक्षण संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात आज महत्वपुर्ण सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य भरात होत असलेलता आंदोलनांमुळे या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 

मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. मागासवर्ग आयोग काय माहिती देणारं हे पाहणं महत्वाचं आहे,दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकावरील गंभीर गुन्हे मागे घेणार असल्याची माहिती दिली आहे.

ही सुनावणी 14 ऑगस्टला होणार होती मात्र मराठा आरक्षणासाठी होणारी आंदोलने तसेच राज्यसरकरवर वाढता दबाव पाहता ही सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयाला केली आणि त्या नुसार ही विनंती मान्य करत ही सुनावणी आठवडाभर आधी घेण्यात येत आहे.

तसेच 9 ऑगस्ट ला मराठा आरक्षणा संदर्भात आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मागासवर्ग आयोग या सुनावणीत काय तपशील देणार आहे या कडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी काढला असा तोडगा...

मराठा आरक्षण : राज्यभरात बैठकांचं आयोजन...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य