Thursday, 17 January 2019

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांनी काढला असा तोडगा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा क्रांती मोर्चातर्फे या आरक्षणासाठी गेले १० दिवस राज्यभर ठिय्या, रास्ता रोको व गनिमी काव्याने आंदोलन सुरु आहे. यात अनेक ठिकाणी हिंसाचार व जाळपोळ होण्याखेरीज विविध जिल्ह्यांत आत्तापर्यंत आठ तरुणांनी आत्महत्या करून प्राण गमावले आहेत.

मागण्या मान्य न झाल्यास ९ आॅगस्टपासून पुन्हा नव्याने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संभाव्य उद्रेक शमविण्यासाठी जनतेशी या थेट संवाद साधला आहे.

‘दूरदर्शन’च्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधताना ही ग्वाही दिली.

  • मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणार आहे.
  • तोपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात येणार
  • तसंच ही प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार
  • राज्य मागासवर्ग आयोगावर सरकार दबाव आणू शकत नाही आणि कायद्याची पूर्तता झाल्याशिवाय आरक्षण देऊ शकणार नाही
  • तर धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा काढणार
loading...

Top 10 News

राशी भविष्य