Thursday, 17 January 2019

रेल्वेने प्रवास करताय, वेळापत्रक नक्की बघा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक असणार आहे. मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने आज मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

  • मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४. १५पर्यंत ब्लॉक असेल. 
  • मेल-एक्स्प्रेससह जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
  • हार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३०पर्यंत सीएसएमटी-पनवेल बेलापूर वाशी-सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल धावणार नाही.
  • ट्रान्सहार्बर सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद असेल.
  • ठाणे-वाशी/नेरूळ तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.
  • पश्चिम रेल्वेमार्गावरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य