Wednesday, 21 November 2018

कायदेशीर, टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा समजाला कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण चर्चेसाठी सरकारनं आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. याबैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. तसचं आंदोलनात हिंसा करू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. 

या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे उपस्थित होते. या बैठकीला उद्योजक भैरवनाथ ठोमरे, कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, अभिनेते सयाजी शिंदे, अमोल कोल्हे, विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, सुवर्ण कोकण संस्थचे डॉ. सतीश परब हजर होते.

मुख्यमंत्री म्हणाले - 

  • विचारवंतांना सोबत घेऊन निर्णय घेऊ
  • समाजासाठी कमी कालावधीच्या आणि दीर्घ कालावधीच्या उपाययोजना करण्यात येणार
  • प्रत्यक्ष कायद्यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही आम्ही वेगाने पूर्ण करीत आहोत.
  • कायद्याच्या पातळीवर टिकेल असे आरक्षण निश्चित वेळेत देऊ.
  • मात्र, याकाळात कोणीही हिंसा करु नये तसेच आत्महत्येसारखी पावले उचलू नयेत असं आवाहन

मराठा क्रांती मोर्चा आजपासून तीव्र, राज्यभर जेलभरो आंदोलन...

मराठा समाजाच्या आरक्षणावर उध्दव ठाकरे यांची बैठक संपली...

loading...

Top 10 News

राशी भविष्य