Wednesday, 16 January 2019

लोकलमध्ये साप, प्रवाशांच्या डोक्याला ताप...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या चाकरमान्यांना लोकलमधून प्रवास करताना कित्येक गोष्टींना सामोरे जावं लागतं, कधी ओव्हरहेड व्हायर, कधी पावसाचं पाणी तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड.

मात्र अता या यादीत आणखी एक कारण आड आलं आहे आणि ते कारण अतिशय थरारक आहे. ज्यामुळे आज मुंबईतील प्रवाशांनी एक थरारक प्रवास अनुभवला आहे. जो ऐकून तुम्ही नक्कीचं थक्क व्हाल.

आज सकाळी 8.33 च्या टिटवाळाहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी नेहमीप्रमाणे चढले आणि लोकल रवाना झाली.

ज्या गोष्टीचा कोणी विचारही केला नसेल अशी भितीदायक गोष्ट म्हणजेचं अचानक ठाणे स्थानकात प्रवाशांना पंख्यावर साप आढळला, साप दिसल्यानंतर साखळी खेचून काही काळ लोकल थांबवण्यात आली होती.

मात्र प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यानंतर खबरदारी म्हणून प्रवाशांनी डब्यातील पंखे आणि दिवे बंद केले.

नंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी अखेर सापाला बाहेर काढले, आणि लोकल पुन्हा रवाना झाली सापाला बाहेर काढल्यानंतर अखेर प्रवाशांमधील भिती कमी झाली आणि प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला.

loading...

Top 10 News

राशी भविष्य