Wednesday, 16 January 2019

शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणास दिला नकार...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज  बैठक होणार आहे. या बैठकीला 22 जिल्हयांमधील समन्वयक हजर राहणार आहेत.

मात्र मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला येण्यास कोल्हापुरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी नकार दिला आहे.

तसेच कोल्हापुरातून शाहू महाराजांसोबतच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार,प्रतापसिंह जाधव यांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावले होते.

मात्र हा निरोप येताच या तिघांनी मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत बैठकीला जाण्यास नकार दिला आहे. ‘58 मोर्चे काढून सरकारला जाग येत नसेल तर बैठक घेऊन काय निर्णय होणार’ असा सवालही श्रीमंत शाहू महाराज यांनी विचारला आहे.

 

मराठा आरक्षणाबाबत बैठकीला श्रीमंत शाहू महाराजांनी का दिला नकार

  • मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी बैठक
  • आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार
  • कोल्हापुरातून शाहू महाराजांसोबतच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार,प्रतापसिंह जाधव यांना बैठकीला मुख्यमंत्र्यांचे आंमत्रण
  • तिघांनी मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत बैठकीला जाण्यास नकार दिला

 

बैठकीला नकार देत शाहू महाराजांनी केला सवाल

बैठकीचा निरोप येताच मराठा समाजातील आंदोलकांची बाजू जाणून घेत श्रीमंत शाहू महाराजांनी बैठकीला जाण्यास नकार दिला तसेच 58 मोर्चे काढून सरकारला जाग येत नसेल तर बैठक घेऊन काय निर्णय होणार असा सवाल श्रीमंत शाहू महाराज यांनी सरकारला विचारला आहे.

 

अॅट्रोसिटी कायद्यात बदल, मात्र मूळ गाभा कायम

वाढलेल्या रेपो रेटमुळे होणार हे परिणाम...

एनआरसीच्या मुद्द्यावरुन राजकारण...

हरियाणाच्या घटनेवर फरहान अखतरचं निषेधात्मक ट्विट...

सांगली- जळगाव मतदान प्रक्रिया पूर्ण, इतकचं झालं मतदान...

loading...

Top 10 News

राशी भविष्य