Tuesday, 20 November 2018

मराठा क्रांती मोर्चा आजपासून तीव्र, राज्यभर जेलभरो आंदोलन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाचं सुरू असलेलं आंदोलन आजपासून आणखी तीव्र केलं जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चा आजपासून राज्यभर जेलभरो आंदोलन करणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन केलं जाणार असून मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात हे आंदोलन असणार आहे. दरम्यान ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी या आंदोलनात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.

ठाण्यात नुकताच झालेल्या मराठा मोर्चात पोलिसांनी आंदोलकांना अटक केली आहे. त्यांना सोडवण्याचा आम्ही प्रयन्त करीत आहोत, तसंच मराठा समाजाचे जेलभरो आंदोलन हे काही राजकीय नेत्यांनी आणि मराठा समाजाच्या काही संघटनांनी जाहीर केले आहे, त्यामुळे या आंदोलनात सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग नसल्याचं समन्वयक दत्ता चव्हाण यांनी सांगितले आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभर जेलभरो आंदोलन

  • मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा समाजाचं सुरू असलेलं आंदोलन आजपासून तीव्र
  • मराठा क्रांती मोर्चा आजपासून राज्यभर जेलभरो आंदोलन
  • मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात हे आंदोलन
  • आंदोलनात सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चाचा सहभाग नसणार

 मी भाषणात काय बोलावे ? मोदींचा भारतीयांना सवाल...

सोलापूरमध्ये बंदला गालबोट, 180 कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई...

चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण...

मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणाची आत्महत्या...

loading...

Top 10 News

राशी भविष्य