Wednesday, 16 January 2019

मुख्यमंत्री आणि मराठा आंदोलकांमध्ये आज बैठक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलकांमध्ये आज बैठक होणार आहे.

मुख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये पहिल्यांदाच थेट बैठक होणार आहे. नारायण राणेही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 

सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा - 

राज्य मागासवर्गीय आयोगाला आरक्षणाबाबतचा अहवाल शक्य तितक्या लवकर द्यावा, अशी विनंती करण्याचेही या बैठकीत ठरले.

तसेच हा अहवाल आल्यानंतर शासनाने वैधानिक बाबी पूर्ण करण्यासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, असाही निर्णयही घेण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने हिंसाचाराच्या आणि पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना वगळून, अन्य ठिकाणी निरपराधांवर तसेच चुकीचे कलम लावून कारवाई करण्यात आलेल्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिल्याचे तसेच आगामी महाभरतीत मराठा समाजाचे आरक्षण सुरक्षित ठेवण्यात येईल.

त्यामध्ये मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितले.

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय गटनेत्यांच्या उपस्थित बैठक सपंन्न...

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा - गडकरी

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष...

loading...

Top 10 News

राशी भविष्य