Friday, 18 January 2019

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा - गडकरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सामाजिक दृष्ट्या मागास समाजाला आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याची घटनेचीच तरतुद आहे, शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे हेच केंद्र आणि राज्य सरकाराची भुमिका असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
 
गडकरी नागपुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. . ‘जातीपातीचे राजकारण करून काही लोक (पक्ष) भाजपची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आमचा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बदल होण्याचा प्रश्नच नाही, असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
 
 

गडकरींचं आरक्षण मुद्द्यावर मत - 

  • लोकशाहीत आंदोलन करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर जे हिंसक आंदोलन सुरु आहे त्यातून कुणाचेच हित नाही
  • मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या आहेत 
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्याचे अनेक जटील प्रश्न सोडवले आहे सिंचनासारखा प्रश्न देखील त्यांनी सोडवला आहे, शेतकऱ्यांच्या बाजुने ते सातत्याने उभे राहिले आहे. 
  • एवढेच नाही तर महाराष्ट्राला विकासाचे मोठ मोठे प्रकल्प आणून राज्याला त्यांनी पुढे नेले आहे. एक अतिशय कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात आपली छाप निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही 
  • देवेद्र फडणवीसांच्या पाठिशी संपुर्ण भाजप पक्ष उभा आहे 
  • येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला माझी अशी विनंती आहे की नेहमी गाव, गरिब आणि  शेतकऱ्यांच्या मागे आमचा पक्ष उभा आहे अशा आमच्या नेत्यांना साथ देण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले. 

मराठा आरक्षण : सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य