Wednesday, 14 November 2018

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील हिंसाचार बंद व्हावा, अशी इच्छा, तसेच आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यास सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, असे राणेंनी पत्रकार परिषदेत  सांगितले आहे. 

मुख्यमंत्री आणि राणेेंचं गुफ्तगू 

आंदोलनाला लागलेले हिंसक वळण थांबले पाहिजे, जाळपोळ, तोडफोड यामुळे राज्याचे नुकसान होते आहे. हे थांबले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांना वाटते आहे असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री यासाठी अनुकूल आहेत, उग्र आंदोलने आणि हिंसक आंदोलने थांबली तर चर्चा सुरू होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाचे नेते आणि राणे समितीचे अध्यक्ष या नात्याने सरकार आणि मराठा समाजात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मध्यस्थी करण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावाच लागेल, असेही राणेंनी म्हटले.  

मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांनी मराठा समाज आंदोलकांच्या समन्वयकांचीही भेट घेतली. तसेच सरकारने आरक्षणासंदर्भात चुका काढून मराठा समाजाची दिशाभूल करू नये. सर्वोतोपरी प्रयत्न करुन कोर्टाला कागदपत्रे सादर करावीत, असेही राणे म्हणाले.

 

राणेंचे पत्रकार परिषदेतले मुद्दे -

 • मराठा आरक्षण मिळावे ही माझीही इच्छा 
 • मात्र, आपणास मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावाच लागले, माझी त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आरक्षणचा मुद्दा अग्रस्थानी
 • तसेच माझ्या अंतर्गत नेमलेल्या समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण कोर्टाने रद्द केले 
 • आम्ही दिलेलं आरक्षण हे तामिळनाडूतील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते.
 • मात्र, सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यात आल्याचे राणे यांनी म्हटले.
 • सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे
 • आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही 
 • मराठा आरक्षणाला शिवसेनेचा विरोध आहे कशीही शिवसेनेनं या बाबत भूमिका मांडली नाही 
 • महाराष्ट्र मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरूच आहे 
 • आत्महत्या होत आहेत जाळपोळ होत आहेत 
 • आंदोलन थांबावं म्हणून मी मुख्यमंत्री यांना भेटलो, चर्चा केली 
 • आरक्षण मिळावं हा एक कलमी कार्यक्रम आहे 
loading...

Top 10 News

राशी भविष्य