Wednesday, 16 January 2019

मराठी तरूणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये - राज ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला आहे. राज्यात सर्व ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत झालेल्या जलसमाधी आंदोलनात एकाचा मृत्यू झाला तर दुसर्‍याने विष घेऊन आपला जीवनप्रवास संपवला.

आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या जीवाचीही परवा न करता आंदोलन करत असलेल्या आंदोलनकर्त्यांना महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलकांना भावनिक आवाहन केले आहे.

तसेच सरकारला इशाराही दिला आहे. या पत्रामध्ये राज ठाकरेंनी 'मराठी तरूणांनी आपला जीव गमावू नका, घरी तुमची वाट पाहणारे कुणीतरी आहे’. असे सांगितले आहे तसेच सरकारनं वास्तुस्थिती स्वच्छपणे समोर ठेवावी उगाच लोकांच्या मनाशी आणि भावंनाशी खेळत बसू नये असा इशाराही सरकारला दिला आहे.

 

राज ठाकरेंच आंदोलकांना आवाहन आणि सरकारला इशारा

  • मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने लोकांच्या भावनांशी खेळत न बसता तत्परतेनं भूमिका घ्यावी आणि ते जर झेपत नसेल तर पायउतार व्हावं, असं रोखठोक मत राज ठाकरे यांनी मांडलं आहे.
  • औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाचा मृत्यू झाल्याने मराठा आंदोलन चिघळलं आणि आता त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
  • रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ, तोडफोडीचं सत्र राज्यभरात पसरत आहे.
  • आधीचं असो किंवा आत्ताचं, या दोन्ही सरकारांना फक्त मतं हवी आहेत.
  • पण या मतांसाठी मराठा समाजाच्या भावनेशी खेळणं अत्यंत वाईट आहे.
  • मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेता येत नसेल, तर सत्ता सोडावी.

 

 

 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांचा जलसमाधी

सकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....

मराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी - चंद्रकात पाटील

मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य