Wednesday, 21 November 2018

मुंबई बंद, मराठा समाज सर्वत्र आक्रमक, पाहा Live अपडेट...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान आज 25 जुलै रोजी मुंबईसह राज्यातील इतर ठिकाणीही बंद पुकारण्यात आला असून या बंदमधून अत्यावश्यक सेवा आणि शाळा व महाविद्यालयांना वगळण्यात आले आहे.

 

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक

 • आरक्षण मुद्द्यावर नाशिकमध्ये मराठासमाजाचे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले आहेत.
 • गंगापूर धरणात आंदोलनकर्ते उतरले असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो पाण्यात बुडवला.
 • बंदला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे. नाशिक तसंच निफाड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून नाशिक शहरात बससेवा पूर्णपणे बंद आहेत.
 • शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी कमी संख्येत उपस्थित राहिले असून बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे.
 • दरम्यान हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी मुख्य पदाधिकऱ्यांना नोटीसा बजावल्या आहेत.
 • सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात जलसमाधी करण्यासाठी आंदोलक पाण्यात उतरले आहेत.
 • अहमदनगरमध्ये बंदला हिंसक वळण लागलं असून कर्जतमध्ये आंदोलनकर्त्यांनी वनविभागाची गाडी पेटवली आहे.
 • ठाण्यामध्ये बंदचा प्रभाव दिसून यावा यासाठी तरुणांनी बाईक रॅलीचं आयोजन केलं असून अनेक तरुणांनी बाईकवरुन फिरत दुकांन बंद करण्याचं आवाहन केलं आहे.
 • अंधेरीमध्येही मराठा समाज एकवटला असून याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको केला आहे, याचा परिणाम रस्ते वाहतूकीवर  झाला आहे.
 • चेंबूर  येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांचा रास्ता रोको सुरू असून यामुळे नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
 • दरम्यान आंदोलकांनी ठिय्या मांडलेल्या जागेवरुन रुग्णवाहिका जात असताना त्यांनी काही वेळ आपलं आंदोलन थांबवलं आणि रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता दिला.
 • मुंबईत आंदोलकांनी आतापर्यंत बेस्टच्या 9 बसेस फोडल्या.
 • मुंबईतील मानखुर्दमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत तसेच आंजोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे.
 • तसेच आंदोलनकर्त्यांनी जोगेश्वरी स्थानकात लोकल ट्रेन थांबवल्या आहेत त्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूकीवर याचा परिणाम झाला आहे.
 • आंदोलकांनी इस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर रास्तारोको केला आहे. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.
 • सध्या मानखुर्दमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 • नालासोपारा वसई आणि विरार मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू असून नालासोपारा पूर्वेपासून पश्चिमपर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे.
 • तर आंदोलनकर्त्यांनी परिसरातील दुकानांना बंद ठोकल्याचं पाहायला मिळतं आहे.
 • ठाण्यामध्ये आंदोलकांनी तीन हातनाक्यावर ठिय्या आंदोलन केलं होतं तर सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
 • तसेच वागळे इस्टेटमध्ये या आंदोलनकर्त्यांनी टीएमटीची बस फोडली. तर इस्टर्न एक्सप्रेस हायवे रोखण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
 • नवी मुंबईमध्ये मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून वाशी, ऐरोलीमध्ये गाड्या रोखण्यात आल्या त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्यांनाही सामोरं जावं लागलं.
 • तसेच रस्त्यावरती भाज्या फेकण्यात आल्या असून आंदोलनात एकाला मारहाण करण्यात आली आहे तसेच रिक्षाचीही तोडफोड करण्यात आली आहे.
 • अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांनी रस्त्यावर उतरून वन विभागाची जिप जाळली.

loading...

Top 10 News

राशी भविष्य