Tuesday, 20 November 2018

सकल मराठा समाजाचं आंदोलकांना आवाहन....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सकल मराठा समाजानं बंद दरम्यान शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलन आपली ताकत आणि समाजातील प्रतिमा मलिन करणारी ठरू नये त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी असं आवाहन समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोमवारी (23 जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली होती. 

हे आवाहन करण्यात आलेत - 

शांतता पुर्ण वातावरणात बंद पार पाडा

मराठा समाजाचा आक्रोश राजकीय पक्ष आणि सरकार विरोधात आहे, त्याला जातीचा रंग देवू नये 

इतर समाजाच्या भावना दुखवु नका, सामाजिक तेढ़ निर्माण करण्यापासून आवर घाला

एम्बुलेंस, दवाखाने मेडिकल बंदमधून वगळा

घोषणा देतांना चुकीची भाषा, शिव्यांचा वापर करु नका

पोलीस प्रशासनासोबत सहकार्य करा

सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी इतर समाज बांधवानी मराठा समाजाला सहकार्य करावे

प्रक्षोभक पोस्ट, व्हिडीओ वायरल करु नका, त्याची माहिती पोलीस प्रशासनाला द्या

बंद दरम्यान महिला, मुलांना त्रास होवू देवू नका

समाजाच्या हक्कासाठी आंदोलन आहे, राजकारणासाठी नाही.

मराठा आंदोलन चिघळलं, राज्यभरात आंदोलनाचे पडसाद, पाहा अपडेट...

मराठा आंदोलनात पेड समाजकंटकांची घुसमखोरी - चंद्रकात पाटील

मराठा समाज आक्रमक, शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारचं आश्वासन....

मराठा आंदोलकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक...

मराठी क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनादरम्यान आंदोलकाचा मृत्यू...

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन, मुख्यमंत्र्यांचा केला निषेध...

loading...

Top 10 News

राशी भविष्य