Friday, 18 January 2019

पंढरपुरात महापूजेचा मान हिंगोलीच्या दांम्पत्यांना; सीएमची 'वर्षा'वर विठ्ठलपूजा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेचा मान हिंगोली येथील अनिल आणि वर्षा जाधव या दाम्पत्यानं मिळवला आहे. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं. 

विठ्ठल मंदिरात मध्यरात्री दोनच्या सुमारास शासकीय महापूजेला सुरुवात झाली. जाधव दाम्पत्यानं पूजा केली.

तसंच दुसरीकडं मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत वर्षा या सरकारी निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मराठा संघटनांनी इशारा दिल्यानंतर फडणवीस यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या अनुपस्थितीत हिंगोलीतील जाधव दाम्पत्याला विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजेचा मान मिळाला.

महाराष्ट्रात विविध आंदोलनांमुळं अशांतता पसरली आहे. शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलालं घातलं.

दरम्यान, फडणवीस यांनी सपत्नीक वर्षा या निवासस्थानी विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे. महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे, असं साकडं फडणवीस यांनी विठ्ठलाला घातलं. 

मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा रद्द...

आषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू

loading...

Top 10 News

राशी भविष्य