Saturday, 17 November 2018

आईने मुलाला दिले दुसऱ्यांदा जीवनदान....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
 
मुंबईतील वाॅकहार्ट रूग्णालयात काव्य राऊत या ९ महिन्याच्या बाळाला लिव्हर ट्रान्सप्लान्ट करण्यात आलं आहे. यासाठी काव्य राऊतच्या आईने स्वत:च्या लिव्हरचा ५० ते ६०% टक्के भाग काढण्यात आला.
 
म्हणजेच २६० ग्रॅम लिव्हरचा पार्ट काढण्यात आला आणि त्यांवर शस्त्रक्रीया करून ते २१० ग्रॅम करण्यात आले.

गेले तीन महिने आम्ही तणावा खाली जगलोय.आज या काव्य राऊतला डीचार्ज मिळतोय त्यामुळे यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ समाधान आहे. अशी भावना काव्य राऊत चे आईवडील व्यक्त करत आहेत.

या शस्त्रक्रियेसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च आला. काव्यच्या आईवडीलांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने डाॅक्टरांसमोर देखील हे मोठे आव्हान होते.

आर्थिक बाजू उचलण्यासाठी चिल्ड्रेन्स हेल्प फाउंडेशन ही संस्था पुढे आली आणि डाॅक्टरांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली. या संस्थेने सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली तसेच या पुढची आर्थिक सुद्धा ही संस्था उचलणार आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य