Friday, 18 January 2019

राज ठाकरेंचा सरकारला 'नीट' इशारा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवरती सडकून टीका केलेली आहे.

दुध आंदोलनामध्ये सरकार दोषी आहे.आधी माहीत होतं की आंदोलन होणार आहे तर बैठक का नाही घेतली, हे राज्य सरकार काहीच करत नाहीये तसाच विषय दुधाचा आहे, बाहेर राज्यातील अमूल वगैरे दूध जे आहे हे इथे घुसवायचा प्रकार चालू आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली.

तर नीट परीक्षा बाबतीत बाहेरून मुले भरली गेली तर त्यांच्यावर आमची नजर असेल? याला हवी तर धमकी समजा, पहिल्यांदा आमच्या राज्यातील मुलांनाच संधी द्यावी मग जागा असतील तर इतरांना द्या असा इशारा यावेळी राज यांनी दिला.

  • महाराष्ट्रात सध्या काय चाललंय हेच कळत नाहीये...
  • शिवस्मारकावर इतका खर्च करण्यापेक्षा गडकिल्ले नीट करा,राम मंदिर झालंच पाहिजे मात्र निवडणुकीचा कारण म्हणून नाही...
  • आता विकास झाला नाही म्हणून भगवद्गीता पुढे आणली चार वर्षात राम मंदिर नाही आठवलं आता निवडणुका जवळ आल्या तर यांना राम मंदिर आठवतंय...
  • नोटा काय बंद करताहेत, दगडावर काय झोपताहेत,काय चाललंय काय?या साठी निवडून दिलाय का ?
  • आधी देश फिट करा आधी मग फिटनेस चॅलेंज बघा अस बोलत राज यांनी मोदीच्या फिटनेस चॅलेंजची खिल्ली उडवली...
  • बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच षडयंत्र आहे असा आरोप देखील राज यांनी केला.
  • तत्पूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतले.अमित ठाकरे हे देखील पत्रकार परिषदेत उपस्थित होते...
loading...

Top 10 News

राशी भविष्य