Wednesday, 16 January 2019

दूध आंदोलनाचा तिसरा दिवस, मुंबईत फक्त आजपुरताच दूधसाठा शिल्लक...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दूध आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र स्वाभिमानी संघटना आजही आक्रमक असलेली पाहायला मिळतेय. जयसिंगपूरमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळचा टँकर जाळलाय तर राजू शेट्टी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दूध रोखण्यासाठी तळ ठोकून आहेत. अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर फेकण्यात आलं.

  • दूधबंद आंदोलन आणखी तीव्र होणार - राजू शेट्टी
  • उद्यापासून राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा
  • शेतकऱ्यांनी आपलं पशुधन रस्त्यांवर उतरवावं - राजू शेट्टी
  • राजू शेट्टीचं शेतकऱ्यांना आवाहन

दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही कोल्हापूरमध्ये आंदोलन भडकल्याचं पाहायला मिळतंय.  आज सकाळपासूनच आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. राधानगरी तालुक्यातल्या सरवडे येथे दूध टेम्पोतील दूध फेकून दिलंय.

गोकुळने आजही संकलन सुरू ठेवलंय. सरकारनं आंदोलकांची धरपकड सुरू केल्यानंतर आता आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. 

मुंबईतील दूध संकलन निम्म्यावर आल्याने मुंबईतल्या अनेक भागात दूध डेऱ्या बंद आहेत. खाजगी दूध कंपन्यांकडे आज दिवसभर पुरेल एवढा साठा आहे मात्र आंदोलन असंच सुरू राहिल्यास गुरुवारी मुंबईत दुधाची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

आज मुंबईत फक्त 50 टक्के दुधाचा साठा आहे..दुधाची कमतरता असल्याने हॉटेल उद्योगावर देखील याचे परिणाम पाहायला मिळत आहेत.

दूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य