Tuesday, 20 November 2018

दूध दरवाढीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेचे आंदोलन...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी मुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला होता, त्याप्रमाणे सोमवारपासून ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या रोखण्यास सुरवात करण्यात आली आहे.

पुणे, औरंगाबाद, बुलडाणा या ठिकाणी सकाळपासून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या फोडल्या आहेत, तर दूधही रस्त्यांवर फेकून दिलं आहे.

गोकुळ दूध संघाला आपलं दूध संकलन आज बंद ठेवावं लागलं आहे. दररोज सुमारे 11 लाख लिटर दुधाचं संकलन करणाऱ्या संघाच्या कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळाला.

त्यामुळे आजच्या या दूध आंदोलनाचा जोरदार फटका गोकूऴला बसला आहे. गोकुळचे सुमारे 5 कोटीचे नुकसान एका दिवसात झाले आहे.

  • दुधाला प्रतिलीटर 5 रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनाला सुरूवात
  • कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ग्रामदेवतेच्या समाधीला दुग्धाभिषेक घालून आंदोलन सुरू
  • ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या रोखण्यास सुरवात
  • बुलडाणामध्ये आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या फोडत, दूध रस्त्यावर ओतून दिले
  • कोल्हापूरहून पोलिस बंदोबस्तात गोकूळचे 12 टॅंकर मुंबईला रवाना झाले आहेत.

आता मल्टिप्लेक्समध्ये नेण्यात येणार बाहेरचे खाद्यपदार्थ...

विठुरायाच्या भाविकांसाठी आता विमा कवच

भगवतगीतेच्या मुद्द्यावरून महाभारत...

भुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून...

loading...

Top 10 News

राशी भविष्य