Wednesday, 16 January 2019

आता मल्टिप्लेक्समध्ये नेण्यात येणार बाहेरचे खाद्यपदार्थ...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हायकोर्टाने 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का विकता, असा सवाल केल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्सविरुद्ध राज्यभर आंदोलन केले होते. त्याविरुद्ध कोर्टाने दावा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अखेर मल्टिप्लेक्स चालकांना राज ठाकरे यांच्या कृष्णकुंजकडे धाव घ्यावी लागली होती.

गेल्या आठवड्यात सर्व मल्टिप्लेक्स सीईओंनी राज ठाकरेंची भेट घेतली. चत्यानंतर चहा-कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्नचे दर 50 रुपयांपर्यंत कमी करावेत.

चहा, कॉफी, पाणी बॉटल, समोसा, पॉपकॉर्न व वडा यांचे दर माफक असावेत. तसेच इतर पदार्थ किती किमतमध्ये विकावेत यावर आक्षेप नाही. लहान मुलांचे अन्न व मधुमेही, हृदयरोगींना बाहेरील अन्नपदार्थ आणण्याची परवानगी मिळावी, मनसेच्या या मागण्या मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.

त्यानंतर आता मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पहायला जाणाऱ्या प्रेकक्षकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मल्टिप्लेक्समध्ये आता बाहेरचे पदार्थ नेता येणार असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली आहे.

तसेच बाहेरून आणलेले पदार्थ आणल्यास अडविल्याचा प्रयत्न केल्यास, मल्टिप्लेक्समध्ये महागडे पदार्थ घेण्यास सक्ती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारने केलेल्या कायद्याप्रमाणे येत्या 1 ऑगस्टपासून एकाच वस्तूची किंमत सगळीकडे एक सारखीच असेल, असेही राज्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

इंस्टाग्राम वापरताय ? तुमचं अंकाउटही होणार वेरिफाइड...

संभाजी भिडे वाट्टेल ते बोलतात - अजित पवार

साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी यापुढे निवडणूक नाही...

आधार-पॅन लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ...

loading...

Top 10 News

राशी भविष्य