Tuesday, 22 January 2019

14 खरिप पिकांच्या हमी भावात वाढ, नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे शेतक-यांना सुखद दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामासाठी 14 पिकांचा हमीभाव वाढवत मोदी सरकारनं शेतक-यांना सुखद धक्का दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळानं या महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. खरिपात शेती करणा-या शेतक-यांचा याचा फायदा होणार आहे.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) सरकारने 2008-09 वित्त वर्षात किमान आधारभूत किमतीत 155 रुपयांची घसघशीत वाढ केली होती. 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा संपुआ सरकारला फायदा झाला होता.

  • हमीभाव वाढवलेल्या पिकांमध्ये गहू, तांदूळसह इतर 14 पिकांचा समावेश 
  • धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रतिक्विंटलनं वाढ 
  • 14 पिकांच्या हमीभावात दीडपटीनं वाढ
  • यंदा भाताला 1,750 रुपयांचा भाव
  • तूर, मूग, उडीद या डाळींच्या किमान आधारभूत किमतींत प्रति क्विंटल किमान 200 रुपयांची वाढ
  • किमान आधारभूत किमतींत 1.5 टक्के वाढ 
  • भात, अन्नधान्ये आणि काही डाळी यांच्या किमतींत वाढ
  • खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामांसाठी सरकार दरवर्षी किमान आधारभूत किमती घोषित करते.

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य