Thursday, 17 January 2019

मुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईसह उपनगरात आज म्हणजेच मंगळवार पहाटेपासून मुसळधार पाऊस हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे मुंबईतूल सखोल भागात पाणी साचलं आहे.

या मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतूल रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.

त्यातचं सकाळच्या सुमारास अंधेरी स्टेशनजवळ पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घनेमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले आहेत. तसेच येत्या 2 दिवसांत मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा.

 

<a href="/exclusive/breaking-news/7170-mumbai-heavy-rain-over-bridge-collapsed-near-andheri-station"

loading...

Top 10 News

राशी भविष्य