Friday, 18 January 2019

नाणार प्रकल्प राज्याच्या फायद्याचा - मुख्यमंत्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

'नाणार प्रकल्प' काहींचा याला विरोध होत असला तरी महाराष्ट्रात हा प्रकल्प येणं ही भाग्याची गोष्ट आहे. मात्र, हा विरोध चर्चेने सोडवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

ही रिफाईनरी महाराष्ट्रात व्हावी ही आमची भूमिका आहे. जे विरोध करतात त्यांना सांगू इच्छितो संवाद- चर्चातून शंका दूर करावी, महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रोजेक्ट व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया -

नाणारमध्ये होणाऱ्या या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा कडाडून विरोध होत आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वनसंपदा धोक्यात येऊ शकते असं इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. दरम्यान, स्थानिकांच्या समर्थनार्थ शिवसेनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिकांचा याला विरोध असेल तर तो होणार नाही असे म्हटले होते. मात्र, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आणि हा प्रकल्प राज्याच्या अधिक फायद्याचा असल्याचं म्हटलं होतं.

उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी आपण त्यांची भेट घेऊ असं धर्मेंद्र प्रधान यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सांगितलं होतं. मात्र, आता करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशाला, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ही भेट नाकारली.

संघर्ष नाणारचा... #GroundZero

उद्धव ठाकरेंनी दिली नाणारला भेट

‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशारा

नाणार प्रकल्पात भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द, सुभाष देसाईंची घोषणा

नाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड

नाणारचा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही - राज ठाकरेनाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

नाणार प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

‘माझ्या भूमिकेत काही बदल नाही’ – नाणार संदर्भात राणेंचं वक्तव्य

‘प्रकल्पाला 95% असहमती असतानाही प्रकल्प लादला जातोय’ - रिफायनरी विरोधी समिती
नाणार प्रकल्प

 • राजापुर नाणार गावात केंद्र शासनाच्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांचा संयुक्त रिफायनरी प्रकल्प होणार आहे. 
 • ‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे.
 • नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते.
 • 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.

काय आहे नाणार प्रकल्प?

 • खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार
 • जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय
 • ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.
 • प्रतिदिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल
 • या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार
 • रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्य

 • जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प
 • जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना
 • वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता
 • हिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी
 • दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य