Friday, 18 January 2019

महाराष्ट्र बँकप्रकरणी सामनामधून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या आग्रलेखात मुख्यमंत्र्यांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फडणवीस यांच्याविरोधात गृहखात्यातूनच षडयंत्र रचले जात असल्याचं सामनातून म्हटलं आहे.

डीएसकेप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावरील कारवाई ही फडणवीसविरोधी गटाची चाल असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत ही चिंतेची बाब आहे. असं सामनातून लिहण्यात आलं आहे.

गृहखात्यात दहशतवादी घुसले आहेत की नक्षलवादी याचा शोध आता घ्यावा लागेल. कारण गृहखात्यात मुख्यमंत्र्यांचे दुश्मन घुसले असतील तर हा धोका फक्त मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर संपूर्ण राज्याला असल्याचं म्हणतं शिवसेनेने याबाबत चिंता व्यक्त केली.

सामनाच्या आग्रलेखात लिहण्यातं आलं :

  • गृहखात्यातच मुख्यमंत्र्यांविरुद्ध षड्यंत्र रचले जात असेल तर कसं व्हायचं!
  • गृहखात्यातील मुख्यमंत्रीविरोधी घुसखोरांशी कुणाचा संबंध आहे?
  • मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून गृहखाते कोण चालवत आहे?
  • मुख्यमंत्र्यांविरोधात कारस्थाने कोण रचित आहे ?

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य