Saturday, 17 November 2018

लिफ्टने घेतला बळी, तुम्ही वापरता ती लिफ्ट आहे का सुरक्षित ?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

घाटकोपर येथील शांतीसागर पोलिस हाऊसिंग सोसायटीत इमारतीची लिफ्ट कोसळून 4 जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली असताना नुकताच मंगळवारी वांद्रे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

राधेशाम हरिजैन असं या व्यक्तीचं नाव असून राधेशाम हे वांद्रे पश्चिम येथील हॉली फॅमीली रुग्णालयाजवळील एव्हरेस्ट अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहत होते. मंगळवारी सकाळी या इमारतीची लिफ्ट अचानक कोसळली, आणि या लिफ्टमध्ये असलेले राधेशाम गंभीर जखमी झाले.

त्यानंतर राधेशाम यांना तातडीने वांद्र्यातील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानचं त्यांचा मृत्यू झाला. मुंबईत लिफ्टच्या दुर्घटेनं 2 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला याबाबत आपण कोणालाही जबाबदार ठरवू शकतं नाही म्हणूनंच तांत्रिक गोष्टींना गृहीत धरणे चुकीचंच आहे. त्या कधीही बिघडू शकतात हे लक्षात ठेवायलाचं हवं.

कशी घ्याल दक्षता ?

  • सोसायटी असेल तर बैठकांमधून लिफ्टच्या चेकलिस्टची तपासणी करा
  • लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना एकट्याने लिफ्ट वापरू देऊ नका
  •  लिफ्टमन ठेवता आला तर अधिक सोयीचे
  •  लिफ्टमध्ये दिलेल्या सूचना कटाक्षाने पाळा
  •  अधिक क्षमतेपेक्षा माणसे, वजन लिफ्टने नेऊ नका
  •  लिफ्ट बंद पडली तर मदतीचे बटण दाबा, फोनचा वापर करा

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य