Friday, 18 January 2019

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीचा फंड - राज ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्लास्टिक व्यापारीकडून निवडणुकीच्या फंडासाठी मागणी केली आहे, ती मान्य नसल्याने प्लास्टिक केली असावी अशी शंका राज ठाकरे यांनी शिवसेनेवर आरोप करत उपस्थित केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

प्लास्टिक बंदीची जबाबदारी महानगर पालिकेची आहे पण आपली जबाबदारी झटकण्यासाठी पालिका लोकांवर प्लास्टिक बंदीचा निर्णय लादत आहे. रामदास कदम यांनी हा निर्णय घेतला पण नद्या ह्या दूषित आहेत पण त्याच काय झालं ? 

अनेक कारखान्याचे पाणी नद्यांत सोडलं जात पिशव्यांचा कचरा होऊ नये यासाठी किती जास्त कचराकुंड्या लावल्यात असा प्रश्नही उपस्थित केला. 

प्लास्टिकॉपासून इंधन नाशिकमध्ये बनवलं जात ज्याने कंपनीचे बॉयलर चालवता येतात जो प्रकल्प नाशिक मध्ये होतो तो इथे होऊ शकत नाही, रामदास कदम यांनी नाशिक मध्ये जाऊन प्लास्टिकचे नियोजन बघून यावे असंही ते यावेळी म्हणाले.

प्लास्टिक बंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बँक ऑफ महाराष्ट्र'चे अध्यक्ष रविंद्र मराठे यांच्यावरील कारवाईमागे मुख्यमंत्र्यांचाच हात असल्याचा घणाघातही राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरे यांचं भाषण 
प्लास्टिक बंदीवर मनसेची भूमिका 
 • नाशिकमध्ये काय केलं हे वाचून दाखवतो... नाशिकमध्ये डंपिंग ग्राउंड होतं याचं काय केलं हे वाचून दाखवलं...
 • महानगर पालिका स्वतःचं काम नीट करत नाहीये आणि दंड कसला लावताय...
 • अनधिकृत बांधकम आणि झोपडपटया वाढतायत त्यावर कारवाई होत नाही... आणि प्लास्टिक पिशवी वापरण्यावर दंड वापरतायत...
 • सगळ्या प्लास्टिक व्यपाऱ्यांकडून मोठा निवडणूक फंड मागितला... हळूहळू हे सगळ शिथिल होईल..
 • प्लास्टिक बंदीवर प्लॅस्टिक वापरणार म्हणजे वापरणार असे व्हाट्सअप फिरले... ती मनसेची अधिकृत भूमिका नाही...
 • अशी प्लास्टिक  बंदी करण्याची काय घाई होती...
 • सगळेजण काय खिश्यात 5000 रुपये घेऊन फिरत नसतो... महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे देशात आहे का... 
 • यावर मुख्यमंत्र्यांचं कुठलंही स्टेटमेंट नाही... हा सरकारचा निर्णय आहे की एका खात्याचा...
 • बंदी टाकायची तर पूर्ण का नाही... काही प्लास्टिक यातून वगळन्यात आलयं..
 • रामदास कदम नद्याच्या साफसफाईचं बोलले होते त्याचं काय झालं...
 • प्लास्टिक बंदी ही पहिली महानगर पालिकेची जबाबदारी आहे... स्वतःच्या गोष्टी लपवण्यासाठीच ही प्लास्टिक बंदी महानगर पालिका आणत आहे...
 • शहरांमध्ये कचरा कुंडया नाहीत... याला महानगर पालिका जबाबदार आहे...
 • रस्त्यावर खड्डे करतात त्या कॉन्ट्रेक्टदारांना दंड नाही...
 • प्लास्टिक बंदी करताना पर्यायी व्यवस्था केली नाही...
 • प्रश्न प्लास्टिकचा नाही त्याचा वापर ज्या पद्धतीनं होतोय त्याचा प्रश्न आहे...
 • रामदास कदम आणि त्यांच्या टीमनी एकदा नाशिकला जावुन बघावं...
 • आज दंड आकरण्यासाठी जे येतील त्यांना सरकारनी आधी काय केलं याचा जाब विचारावा...
 • सरकारने कारवाई थांबवावी... आधी व्यवस्था करा... सरकारनी आधी त्यांचे काम करा मग दूसऱ्याला अक्कल शिकवा...

प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल - रामदास कदम

'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे

प्लास्टिकच्या या वस्तुंवर बंदी नाही...

प्लास्टिकच्या या वस्तुंवर बंदी नाही...

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

loading...

Top 10 News

राशी भविष्य