Tuesday, 20 November 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर सडकून टिका...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. आज सकाळी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाली सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मोदी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानंतर थेट अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बॅंकेच्या वार्षिक बैठकीचे उद्घाटन केले.

यामध्ये आशियाई देशातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दरम्यान, एआयआयबीच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी भाजपने बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.

या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी आणीबाणीवर भाषण केलं. आणीबाणीला आज म्हणजेचं 25 जून या दिवशी 43 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने आणीबाणीच्या निषेधार्थ नेत्यांना देशभर पत्रकार परिषद घेण्यास सांगितले आहे.

'आणीबाणी हे काँग्रेसचं पाप आहे’. ‘काँग्रेसने एका कुटुंबासाठी संविधानाचा दुरुपयोग करत देशात आणीबाणी लागू केली’. असं वक्तव्य करत मोदींनी काँग्रेसवर सडकून टिका केली.

आणीबाणी व लोकशाहीबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी :

 • आणीबाणी हा लोकशाहीचा काळा दिवस - नरेंद्र मोदी
 • एका कुटुंबाने लोकशाहीच्या नावाखाली सत्तेचा दुरूपयोग केला- नरेंद्र मोदी
 • जागरूक नागरिकांनी या दिवसाचे कायम स्मरण केले पाहिजे- नरेंद्र मोदी
 • आणीबाणी हे काँग्रेसचं पाप व लोकशाहीवरील काळ डाग- नरेंद्र मोदी
 • लोकशाही, राज्यघटना याबाबत आस्था पाहिजे- नरेंद्र मोदी
 • आता सरन्यायाधिशाविरोधात हक्कभंग आणणे व आणीबाणीच्या काळातील काँग्रेस एकसारखीच- नरेंद्र मोदी
 • भारतातील निवडणूक आयोगाला जग वंदन करते मात्र काँग्रेसने त्यालाही बदनाम करण्याचे काम केले- नरेंद्र मोदी
 • काँग्रेसमुळे देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आली. आता महाभियोग त्याचाच एक भाग- नरेंद्र मोदी
 • एका घराण्याने स्वार्थासाठी पक्षाचेही तुकडे केले- नरेंद्र मोदी
 • काँग्रेसमध्ये लोकशाहीची मानसिकता नाही, गायक किशोर कुमार यांची गाणी रेडिओवरून गायब का करण्यात आली- नरेंद्र मोदी
 • काँग्रेसने राज्यघटना उद्धवस्त केले मात्र आता मोदी राज्यघटना बदलेल अशी भीती दाखवली जात आहे- नरेंद्र मोदी
 • विविधतेने नटलेल्या भारत देशाला बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटनाच एकत्र ठेवेल- नरेंद्र मोदी
loading...

Top 10 News

राशी भविष्य