Monday, 21 January 2019

मुसळधार पावसाने कोसळली भिंत...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या कोसळधार पावसाचा फटका वडाळ्यातील लॉर्ड्स इस्टेट परिसरातील दोस्ती पार्क या इमारतीला बसला आहे.

या इमारतीच्या पार्किंग भागाची भिंत खचल्यामुळे मोठा खड्डा पडला असून यामध्ये 15 ते 20 गाड्यांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना जेथे घडली त्याच ठिकाणी काही कामगार राहत होते.

यातील काही कामगारांच्या झोपड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याची शक्यता केला जात आहे. या ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोस्ती बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोस्ती बिल्डरनं व्हायब्रेटरच्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

दिपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावं आहेत.

मुंबई तुंबली नाही - महापौर, उद्धव ठाकरेंचा अजब दावा

#MumbaiRain सांताक्रूझमध्ये सर्वात जास्त पाऊस...

#MumbaiRain मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मुंबईची लाईफलाइन विस्कळीत...

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य