Thursday, 17 January 2019

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षण मतदारसंघासाठी आज मतदान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षण चार मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत हे मतदान होत आहे.

मात्र, सकाळपासूनच मुंबईसह कोकण परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने मतदानावर त्याचा मोठा परिणाम झाल्याची माहिती येत आहे.

शहरी भागात पावसामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे ट्राफिक जाम झाल्याने मतदानासाठी किती बाहेर पडतील याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

मुंबई व कोकण पदवीधर या दोन जागांसाठी तर मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या दोन जागा अशा एकून चार जागांसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान होत आहे.

मुंबई पदवीधर- उमेदवार व पक्ष

विलास पोतनीस- शिवसेना

अॅड. अमितकुमार मेहता- भाजप

जालिंदर सरोदे- कपिल पाटील यांचा लोकतांत्रिक जनता दल पक्ष

राजू बंडगर- मनसे स्वाभिमानी पुरस्कृत व मनसेचा पाठिंबा

डॉ. दीपक पवार- अपक्ष

मुंबई पदवीधरसाठी 70 हजार मतदार

  • मुंबई उपनगरात 52 हजार मतदार
  • मुंबई शहरात 18 हजार मतदार 

कोकण पदवीधर उमेदवार व पक्ष

संजय मोरे- शिवसेना

निरंजन डावखरे- भाजप

नजीब मुल्ला- राष्ट्रवादी काँग्रेस

कोकण पदवीधर 1 लाख चार हजार मतदार

  • ठाणे : 45 हजार
  • पालघर : 16 हजार
  • सिंधुदुर्ग : 5.3 हजार
  • रत्नागिरी : 16 हजार
  • रायगड : 19 हजार

मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार

शिवाजी शेंडगे- शिवसेना

कपिल पाटील- लोकतांत्रिक जनता दल

अनिल देशमुख- भाजप

एकूण 10 हजार 169 मतदार

  • मुबई उपनगर : 8273
  • मुंबई शहर : 1896
loading...

Top 10 News

राशी भविष्य