Friday, 18 January 2019

प्रसिद्ध बांधकाम डी.एस.कुलकर्णींमुळे 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या अडचणीत वाढ...

User Rating: 5 / 5

Star ActiveStar ActiveStar ActiveStar ActiveStar Active
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्र समोरील अडचणीत वाढ असतानाच बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. मराठे आणि तत्कालीन क्षेत्रीय व्यवस्थापक एन एस. देशपांडे यांच्यासह 6 जणांना डीएसके गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणी आज पोलिसांनी अटक केली आहे.

ताब्यात घेतलेल्या इतर व्यक्तींमध्ये बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुशिल मुहनोत, बँकेचे कार्यकारी संचालक आर. के.गुप्ता आणि  डी.एस. कुलकर्णी  डॅव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य अभियंता राजीव नेवासकर यांचाही समावेश आहे. 

प्रकल्पाला ज्या कारणासाठी कर्ज देण्यात आले त्या पैशाचा बॅक अधिका-यांशी संगनमताने अपहार करण्यात आला. बँकेचा पैसा शेवटी सार्वजनिक पैसा आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे सर्व बँकांना लागू आहेत. सार्वजनिक संस्थांच्या  पैशांचा उपयोग खाजगी पैसा असल्यासारखा करण्यात आला. या व्यवहारांमध्ये कोणताही कायदेशीरपणा नाही, असा आरोप आहे की बँकेने अनेक अनियमितता माहित असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केली. 

कर्ज मंजूर करण्यापूर्वी कोणतीही काळजी घेतली नाही . कर्ज मंजूर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झाले नाही. कर्जाचा वापर ज्या कारणासाठी ते दिले होते त्याच कारणासाठी ते वापरले जात आहे की नाही हे तपासले नाही. एक कर्ज तर "कॅश फ्लोचा तात्पुरता मेळ घालण्यासाठी " या कारणासाठी मंजूर करण्यात आले.

loading...

Top 10 News

राशी भविष्य